Header Ads Widget

Responsive Advertisement

म्हसा विद्यालयात शालेय गणवेश वाटप...

(दि.03, POL - मुरबाड) 

वीर भाई कोतवाल विद्यालय,म्हसा (ता.मुरबाड)  कल्याण येथील LIC चे अधिकारी पद्माकर भोईर व प्रसिद्ध उद्योजक दर्शन भोईर यांनी आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनींना मोफत शालेय गणवेशाचे वाटप केले.

      प्रा.डॉ.चंद्रमणी मोहिते,सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र बडगुजर, भुपेंद्र भालेराव,प्रा प्रदीप पाटील,बी डी लोहार, सुनिल रेंघे ,सौ मिनाक्षी गोडांबे,सौ.धनश्री साबळे यांच्या हस्ते आदिवासी व गरजू मुलांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.

                 सगळ्यांना एकसारखा गणवेश या मागचा हेतू हाच असतो की शालेय जीवनापासूनच एकतेची भावना निर्माण व्हावी, देशाबद्दलचा अभिमान,प्रेम जागृत होऊन खरी देशभक्ती दिसावी,असे मौलिक विचार बडगुजर सरांनी व्यक्त केले.या वेळी LIC अधिकारी पद्माकर भोईर यांनीही यांनीही विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  महेंद्र बेंद्रे यांनी केले. यानंतर आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments