Header Ads Widget

Responsive Advertisement

बदलापूर मधील विद्दयार्थीनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात आरोपीला फाशी देऊन न्याय मिळावा म्हणून पत्रकार सौ.मयुरी कुणाल शेलार यांचे मुरबाड पोलीस ठाण्याचे वपोनि प्रमोद बाबर यांना निवेदन...

 

(दि.22,POL - मुरबाड)

बदलापूर येथील आदर्श विद्दयामंदीर येथे अल्पवयीन विद्दयार्थीनीवर अक्षय शिंदे या नराधमाने लैगिंक शोषण करून अत्याचार केले असल्याने त्यासंदर्भात सर्वत्र महाराष्ट्रात निषेधाचे पडसाद उमटत आहेत.या घटनेने बदलापूरमध्ये मोठया प्रमाणात लहान मोठे तरूण महिला वर्ग न्याय मिळावा व नराधमास तत्काळ फाशी मिळावी म्हणून रस्त्यावर उतरले होते.रेल्वे स्टेशनमध्येही सर्व नागरिकांसह महिलांनी आंदोलनाची भूमिका हाती घेतली.मुरबाड शहरातही शालेय विद्दयार्थी,सर्व क्षेत्रातील समाजसेवक,कार्यकर्ते,महिला भगिनी,नागरिक,यांनी जन आक्रोशाचा पावित्रा स्विकारत निषेध व्यक्त करून त्या नराधमास फाशी द्दया अशी मागणी केली.सदर घटनेचा पडसात तीव्र भावनेतून उमटले असून घटलेल्या घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी यांच्यासह मंत्री यांनी भेट दिली.सुज्ञ नागरिकांनी या निंदनीय घटनेचा निषेध व्यक्त करून सदर आपला निषेध निवेदन मुरबाड पोलीस,तहसिलदार मुरबाड कार्यालय यांच्यामार्फत शासनाला दिला आहे.

          बदलापूर येथील 3 वर्षाच्या चिमुकलीवर त्याच शाळेत काम करणारा कर्मचारी अक्षय शिंदे या नराधमाने लौंगिक शोषण करून अत्याचार केल्याच्या निषेधार्थ सर्व विद्दयालय व शिक्षक,विद्दयार्थी,पालकांनी मोठया संख्येने आक्रोश  मोर्चात सहभागी झाले होते.दै.पॉवर ऑफ लोकशाही वृत्तपत्र व डिजीटल वृत्तवाहिनीकडूनही या घडलेल्या घटनेचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला असून बदलापूर मधील विद्दयार्थीनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात अक्षय शिंदे या नराधमास तत्काळ फाशी देऊन पिडीतेला न्याय मिळवून द्दयावे म्हणून पत्रकार सौ.मयुरी कुणाल शेलार,संजना कापडी,चंदना कापडी यांनी मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.प्रमोद बाबर यांना सदर निषेध निवेदन दिले. सरकारने जनतेच्या मागण्यांचा विचार करून पुन्हा असे कृत्य करण्याचा विचार कोणत्याही नराधमाच्या मस्तकात येऊ नये,आमच्या महिला भविष्यात संरक्षित राहो म्हणून कठोर कारवार्इ तत्काळ फाशी देऊन करणे काळाची गरज ठरेल अशी भावना यावेळी सौ.मयुरी शेलार यांनी आमच्याशी बोलतांना व्यक्त केली.

 

Post a Comment

0 Comments