Header Ads Widget

Responsive Advertisement

अगस्त्या फाऊंडेशनच्या वतीने शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न...

 

दि,13,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

विद्दयामंदीर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्दयालय शिवळे येथे अगस्त्या फाऊंडेशनच्या वतीने शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते.यावेळी दिप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या पुजनाने या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.सदर कार्यक्रमातून शिक्षकांना सर्व प्रकाराच्या प्रयोग,उपक्रमाची माहिती देत त्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखविण्यात आले व हेच प्रयोग विद्दयार्थ्यांना शिकवून त्यांना विज्ञानाविषयी ज्ञान संपादन करून दिल्यास आजचा विद्दयार्थी त्याच्या कलागुणांनी उद्दयाचा विज्ञानक बनेल असा विश्‍वास यावेळी शिक्षकांसमोर अगस्त्या फाऊंडेशननी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील विद्दयार्थ्यांना प्रयोगाचे साहित्य,नैसिर्गिक साहित्य,रॉ मटेरियल,खर्चिक व अखर्चिक असल्याने आपण सदर प्रशिक्षण घेतल्यास या प्रयोग प्रशिक्षणातून विज्ञान शिक्षकांच्या माध्यमातून विद्दयार्थ्यांना त्याचा लाभ होईल,विद्दयार्थ्यांनाही त्याची आवड व उत्सुकता निर्माण व्हावी म्हणुन हे प्रशिक्षण माध्यमिक शाळेतील शिक्षकांकरिता घेण्यात आले होते.या प्रशिक्षणाला 29 शाळेतील शिक्षक उपस्थित होते.जर या प्रयोगातून विज्ञान क्षेत्रातील विद्दयार्थी घडला तर तो नक्कीच शासनाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती प्राप्त करू शकेल असे मनोगत आपल्या संभाषणात प्रमुख मान्यवर श्री.रमेश तुंगार सर(पंचायत समिती,मुरबाड) यांनी व्यक्त केले.तर विज्ञान क्षेत्रात आज वैज्ञानिक विद्दयार्थी तयार झाले तर देशाचे अभिमान होणारे कार्य घडतील असे विद्दयामंदीर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्दयालय शिवळेचे प्राचार्य तथा या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर श्री.यशवंत धलपे सर यांनी शिक्षकांशी संवाद साधतांना या कार्यक्रमातून आपले विचार प्रकट केले.

या कार्यक्रमात अगस्त्या फाऊंडेशनच्या वतीने उत्तम विशे,श्री.सुमीत सर,रिंकू पडवळ,तेजस्विता माळी यांनी चांगल्या प्रकारे वैज्ञानिक प्रयोग लो क्वॉस्ट मॉडेल,खेळ,मनोरंजन अक्टिव्हीटी सादर करून नंतर ते शिक्षकांकडून करून घेतल्या.सदर कार्यक्रम हा मोठया हर्षाने पार पडले असता या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून श्री.यशवंत धलपे सर (प्राचार्य),श्री.रमेश तुंगार सर(पंचायत समिती,मुरबाड),पत्रकार कुणाल शेलार,श्री.जामघरे सर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.हे कार्यक्रम सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात आल्याने सदर सहभागी शिक्षकांना अगस्त्या फाऊंडेशनच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.

 

Post a Comment

0 Comments