Header Ads Widget

Responsive Advertisement

मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता पदी संजय कोरडे यांची नियुक्ती...

दि.०३-POL, कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता म्हणून संजय कोरडे यांची नियुक्ती झाली आहे.संजय कोरडे हे या पुर्वी जि.प.बांधकाम विभागाचे उपअभियंता म्हणून कार्यरत होते. मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता  कैलास पंतिगराव हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा जागी संजय कोरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शाखा अभियंता ते उपविभागीय उपअभियंता अशा पद श्रेणीने शासकीय सेवेत कोरडे यांनी उत्कृष्ट काम केले असल्याने त्यांचा अनेक वर्षाचा बांधकाम क्षेत्रातील अनुभव मुरबाड तालुक्याला फायदेशीर होईल व तालुक्याच्या विकासाला गती मिळेल‌ अशी चर्चा सर्वत्र होत आहे. अशा सर्व समावेशक,शांत स्वभाव असणार्या अधिकार्याला तालुक्यातून अनेक लोकप्रतिनिधी व ठेकेदारांनी तसेच त्यांच्या मित्र परिवाराने  पदभार स्वीकारल्यावर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments