BIG BREAKING NEWS...

देव तारी त्यांस कोण मारी ; जनसामाण्यांच्या आशिर्वादाने संतोष पवार सुखरूप बचावले...


 दि,03,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील मुरबाड म्हसा रोड वरील काकडपाडा गावाजवळ काल सकाळी पहाटेच्या सुमारास मुरबाड तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे चेअरमन संतोष पवार यांचे चारचाकी वाहनांचा अपघात झाला.हा अपघात भयावह असल्याने चारचाकी वाहन उलटे झाले होते परंतु ते म्हणतात ना ''देव तारी त्यांना कोण मारी'' असाच चमत्कार घडला आहे.सदैव शेतकरी बांधवांचे व जनसामान्यांचे हित पाहणारे संतोष पवार यांना हजारो नागरिकांचा आशिर्वाद लाभल्याने अपघात घडला असता जीवितहाणी टळली आहे.संतोष पवार यांचा अपघात झाला असता ते सुदैवाने बचावले असुन थोडया प्रमाणात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.सदर अपघात झाले असल्याची माहिती कळताच आजुबाजूचे नागरिकांनी मदतकार्य हाती घेत श्री.पवार यांना सुरक्षित गाडीच्या बाहेर काढले.

आज संतोष पवार यांचे समाजकार्य ठाणे जिल्हयात चर्चेत असून ते आमदार किसन कथोरे यांचे कट्टर समर्थक आहेत त्यांच्या कार्याची चर्चा सदैव जिल्हयाच्या नकाशा पटलावर कोरली असल्याने सहाजिकच जनसामान्यांबरोबर शेतकरी बांधवांचा आशिर्वाद असल्याने अशा समाजसेवकाच्या पाठिशी तर देव सुध्दा सदैव ठामपणे उभा राहतो आणि यावेळी देव जनमाणसांच्या रूपात धाऊन आल्याने हा चमत्कार आपल्या डोळयासमोरच आहे.घडलेल्या अपघाताची माहिती आमदार किसन कथोरे यांना कळताच त्यांनी तात्काळ संतोष पवार यांना फोन करून मुलाप्रमाणे काळजी घेत सुखरूप असल्याची विचारणा करून आराम करण्याचे सांगितले आहे.यावेळी समस्त तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तीमत्व व नागरिक,शेतकरी बांधवांनी त्यांना भेटून तसेच फोन द्वारे त्यांची विचारपुस करून तुमच्या हातून अजून बरेच सत्कर्म कार्य करायचे आहेत अशा भावनिक भावना व्यक्त केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post