BIG BREAKING NEWS...

बोलघेवडयांनी अंथरून बघुन पाय पसरावं - युवा नेते अनिल घरत

 


दि,18,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

गेल्या 1 महिण्यांपासून मुरबाड टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रिज इंडिया कंपनीत काम करणार्‍या कामगार अनेक मागण्यांकरिता संपावर गेले असून याच कंपनीच्या बाहेर ठिया संप त्यांनी पुकारले असून याबाबत मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी जातीने लक्ष वेधून सर्वप्रथम पुढाकार घेत कल्याण येथील कामगार आयुक्त यांना तात्काळ पत्रव्यवहार करून या प्रकरणावर प्रशासनांनी लक्ष वेधून न्याय मिळवून देण्यात यावे म्हणून कळविले असता त्या पत्राच्या अनुषंगाने तात्काळ सुनावणी घेण्यात आली त्यानंतर आमदार किसन कथोरे यांचेकडून प्रतिनिधीत्व म्हणून कामगारांच्या बाजुने युवा नेते अनिल घरत यांनी अनेक कागदोपत्री पुरावे आपल्या हाती घेऊन सुनावणीला उपस्थित राहिले यामध्ये अनेक प्रश्‍न कामगारांच्या भविष्याबाबत मांडण्यात आले त्यानंतर पुढील बाजू एैकण्यासाठी पुढील तारिख सुनावणीची अधोरेखित केली.सर्व जनतेला ज्ञात आहे की सुनावणी सुरू झाली असता एक किंवा दोन तारखेत कुठलेही प्रशासन निर्णय लावत नसतो सदरचा निर्णय न्यायहितार्थ असल्याने संयम हा ठेवणे न्याय मिळण्याचा माध्यम असतो परंतु काही सोमे गोमे देखावा करित असल्याने कामगारांच्या पाठिशी आमदार किसन कथोरे असून त्यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपल्या हाती घेतली असून त्याबाबत मी प्रतिनिधीत्व करित असून कामगारांनी कोणाच्याही भूलथापा व भडकावू भाष्यांना बळी पडू नका,पुढे पुढे करणारे चेहरा दाखवितात परंतु अधिकारी त्यांना जवळही उभे करित नाही या पलिकडे कोणाची किंमत किती आणि आपण मार्मिक टिका टिपण्णी कोणावर करतो याचं भान असावं,त्या बोलघेवडयाकडे आम्ही लक्षही देत नाही.कोणी येतो आणि हे असे ते तसे असे बोलून अनेक प्रश्‍नातून संभ्रम निर्माण करतो परंतु या उठाठेवी त्यानी बंद करावं,स्वतःला फेमस करायचं म्हणून काहीही बोलावं आपण बोलतोय काय कुणाबद्दल याच भान आता उरलेले नसून बघणारा व्यक्ती याच फेमसगिरीवर हसत बसतो त्यामुळे जरा अंथरून बघुन पाय पसरावं असा माझा बोलघेवडयाला सल्ला असून कामगारांनी संयम ठेवावे विजय आपलाच होणार असे युवा नेते अनिल घरत यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.

 

 

 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post