BIG BREAKING NEWS...

आमदार किसन कथोरे यांचा जादूई चष्मा खाली...

 

दि,03,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड नगरपंचायती मध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाने वेगळा टप्पा गाठून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून एक वेगळी नांदी तयार केली होती परंतु आमदार किसन कथोरे यांचा जादू चष्मा खाली जसा बदलापूर येथे गेला होता तसाच मुरबाड नगरपंचायतींच्या बंडखोर नगरसेविकांसाठी खाली गेला त्याचे पडसात संपूर्ण महाराष्ट्र सध्या पाहत असून आमदार किसन कथोरे यांच्याशी वैर व बंडखोरी करून त्यांचे अस्तीत्व पुसण्याचा कारस्थान झाला असल्याच्या चर्चा मध्यस्थी रंगल्या होत्या परंतु आमदार कथोरे यांना झुकविण्यासाठी अजून जन्माला यायचं आहे अशा समर्थकांच्या ज्वलंत प्रतिक्रियाही तितक्याच प्रभावी होत्या आणि तो काळ जास्त वेळ थांबला नाही बहुमत निवडणूक आणि काही तासांतच त्यांच्याच सोबत असणारे नगरसेवकांनी अविश्‍वास ठराव आणला हा खेळ अद्दयापही जनतेला कळाले नसून काही क्षणातच मुरबाड नगरपंचायत सत्ता जी हातातुन गेली होती ती पुन्हा आमदार किसन कथोरे यांच्या हातात येणार असल्याची खलबतं प्रक्रिया घडल्याचे समोर आली आहे.अविश्‍वास ठरावाच्या विरोधात सभेपूर्वी परिवर्तन पॅनेलकडून शिंदे गटात गेलेले बंडखोर नगराध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे कळताच सदरची सभा रद्द झाली आणि मुरबाड नगरपंचायतीत आमदार किसन कथोरे यांच्या सत्ता स्थापनेचे दार खुले झाले असल्याचे कळते.आमदार किसन कथोरे यांच्या विरोधात भलेभले आले आणि गेले परंतु त्यांना चॅलेंज आवडले नाही त्यामुळे दुरदृष्टीच्या नेत्याच्या विरोधात जे गेले त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे याचे उदाहरण अनेक जनताच सांगू शकेल.सध्या मुरबाडच्या नगरपंचायतीमधील राजकीय समीकरणे वेगळया स्वरूपाची असून शिंदे गटाला शह देण्यासाठी शिंदे गटात गेलेले नगरसेवकच भाजपामध्ये येऊन आमदार किसन कथोरे यांची भेट घेऊन घरवापसी केले आहे.'' बाबा मला माफ करा '' या वाक्याने संभ्रम जो तयार झाला होता त्याची पुनरावृत्ती चष्मा खाली गेल्याने नगरसेवकांची घरवापसी झाली असावी असे जाणकरांचे मत आहे. 12 नगरसेवकांनी एकाच वेळी एकाच क्षणात आमदार कथोरे यांच्याकडे घरवापसी केल्याने आमदार कथोरे यांनी खेळी खेळल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्यासाठी हा राजकीय मोठा धक्का असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

          नगराध्यक्षांच्या राजीनाम्या मुळे सत्तासंघर्ष जरी टळली असली तरी आमदार कथोरे यांची सत्ता येणार यात सध्या तरी शंका वाटतच नाही.नगरपंचायत स्थापनेपासून आमदार किसन कथोरे यांनी विविध विकासकामांसाठी कोटयावधी रूपयाचा निधी आणला,मुरबाड शहाराचा चेहरा बदलला परंतु आमदार किसन कथोरे यांच्याशी गद्दारी केले हे त्यांनी अनेक वेळा बोलून दाखविल्याने जनतेसमोर हा चेहरा येणार्‍या निवडणूकीत निवडून येल का? यांनाच आमदार कथोरे उमेदवारीचे तिकीटं देतील का ? असा प्रश्‍नही उपस्थित राहत आहेत.नगरसेवकांनी घरवापसी केल्याने मुरबाड नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदाच्या नावाची चर्चा जोमाने सुरू असून सध्या राजकीय वर्तुळात नगसेविका मधुरा मोहन सासे व नगरसेवक मोहन गडगे यांच्या नावाची चर्चा असल्याचे समजते.या पुढे सर्व नगरसेवकांनी स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण न करता मुरबाडच्या विकासाकडे लक्ष द्यावे व कोणासोबतच बंडखोरी न करता विकासासोबत असावे असे अनेकांचे म्हणणे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post