मुरबाड कल्याण रोडवरील रायता पुलावर भिषण अपघात 11 जणांचा मृत्यु ; कालच्या घडलेल्या सर्व अपघातांची मालिका...

 

दि,14,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

काल मुरबाड कल्याण रोडवरील रायता पुलावर डंपर मिक्सर व को कालीपिली वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने मोठया भिषण प्रभावात अपघात झाला असून यामध्ये कालीपिली वाहनचालकासह प्रवासी यांचे या अपघातात निधन झाले असून 11 जण जागीच ठार झाले आहे.यामध्ये 9 जणांची माहिती मिळाली असून

1. प्रशांत उर्फ बबलू रुपेश चंदने(पुरुष,वय 21 वर्ष, देवगाव मुरबाड)

2. भूषण घोरपडे भाऊसाहेब (पुरुष,वय 49 वर्ष,अंधेरी मुंबई.तहसिलदार कार्यालय मुरबाड या कार्यालयात महसूल सहाय्यक)

3. जिजाबा गोविंद केंबारी (महिला,वय 50 वर्ष,टेंभरे मुरबाड)

4. अनंता गणेश पवार (पुरुष,साखरे मुरबाड)

5. दिपक गवळी (पुरुष,राहणार कल्याण)

6. गणपत जैनू मधे (पुरुष,वय 32 वर्ष,देवराळवाडी मुरबाड)

7. स्नेहा मोहपे(महिला,वय अंदाजे 22 वर्ष,पर्‍हे,मुरबाड)

8. मानसी मोहपे(महिला, वय अंदाजे 20 वर्ष,पर्‍हे,मुरबाड)

9. प्रथमेश मोहपे(पुरुष,वय अंदाजे 17 वर्ष,पर्‍हे,मुरबाड)

अशी मयतांची नावे असून हा अपघात अतिशय भयावह पध्दतीने झाला असून यामध्ये कोणताही प्रवासी बचावला नाही त्यामुळे या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून दुखःचे डोंगर प्रवासी यांच्या कुटूंबावर पसरले आहे.सदरची घटना मुरबाड तालुक्यासह ठाणे जिल्हा हदरवून करणारी ठरली आहे.या अपघाताची माहिती कळताच आपली मिटींग सोडून तात्काळ घटनास्थळी आमदार किसन कथोरे हे पोहोचले व संबंधित यंत्रणेला फोन करून तात्काळ मदतीसाठी येण्याच्या सुचना केल्या.अत्यंत दुखःद घटना ही प्रथमच अशा काळाच्या कुशीत घडली असून सर्वत्र नागरिकही निशब्द झाले.घडलेल्या अपघातात इतका भिषण होता की को कालीपिली गाडीचा पुढील भाग हा संपुर्ण चेमटला गेला.त्यामुळे प्रवाशांना बचावासाठी व आपला जीव वाचविण्यासाठी क्षणाचाही वेळ मिळाला नाही.सदर दुर्घटनेत मयत व्यक्तींची ओळख पटली त्यांची माहिती नावासहित व्हॉट्सअपद्वारे फिरत होती.या 11 जणांच्या मृत्युमुखीमध्ये सुरूवातीला 5 मयत व्यक्ती मुरबाडमधील असल्याने त्यांना पोस्टमॉर्टमकरिता मुरबाड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले व इतर मृत्युमुखींना गोवेली येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.यावेळी मयत कुटूंबियांच्या नातेवाकांची एकच गर्दी झाली.नातेवाकांच्या डोळयातील अश्रृ थांबले नाहीत माझा आधार गेला असे हंबरटाच फोडु लागले त्यांना पाहून अनेकांच्या डोळयातही अश्रृ आले.सदर घडलेल्या घटनेत सर्वच निधन झालेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रध्दांजली करण्यात आली असून सर्वत्र शोकाकुळ पसरली आहे.

 आरटीओ अपयशी -

को कालीपिली गाडयांचा वेग नेहमी जास्त असून या वेगावर ताबा मिळविण्यात आरटीओ यांना अपयश आले आहे.यासंदर्भात अनेक वेळा पत्रकार यांनी आरटीओ यांच्या मनमानी व अपयशी गाथांची मालिका व पत्रव्यवहार करून मंत्रालयविभागांनाही कळविले होते परंतु त्यावर कोणतीच कारवा झाली नाही त्यामुळेच हा अपघात झाला असून यामध्ये खरे तर आरटीओ अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.ओव्हरलोड डंपर,को कालीपिली खाजगी गाडया यांच्यावर कधीच लक्ष वेधले गेले नसल्याने आरटीओ नेमकी मार्च अखेरलाच दिसत असते.आरटीओ केवळ गरिबांसाठी नियम सांगून दंडात्मक कारवा करते परंतु मोठ मोठया गाडया,को कालीपिली यांच्यावर आशिर्वाद कशासाठी याबाबत मुख्यमंत्री यांनी लक्ष वेधणे म्हणजे पुढील असाच भिषण अपघात टळेल.आज ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली त्यांच्या दुखःच्या यातना शब्दाने व्यक्त करता येत नाही त्यामुळे आरटीओ पुन्हा ही घटना विसरून आपल्या मनमानीने आपला कारभार जशाच तसे सुरू ठेवतील याची प्रचिती पुन्हा दिसेलच.वेगवान गाडयांवर ताबा मिळविण्यासाठी आरटीओ अधिकारी आपल्या नियमांची गोठडी कधी सोडतील याकडे लक्ष लागून आहे.

 मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे डॉक्टर ताटावरून उठले -

सदर भिषण अपघाताची माहिती मिळताच आमदार किसन कथोरे,ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी तात्काळ यंत्रणा निर्गमित केली.मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकिय अधिक्षीक डॉ.संग्राम डांगे यांना आमदार किसन कथोरे,डॉ.कैलास पवार यांचे फोनवर फोन चालूच होते.तात्काळ उपाययोजना तयार ठेवा मयत व्यक्तींना मुरबाडमध्ये पोस्टमॉर्टमकरिता आणण्यात येणार आहे यावर डॉ.संग्राम डांगे यांनी तात्काळ सर्वच डॉक्टरांना एकत्रीत केले यामध्ये काही डॉक्टर ऑफ डयुटीवर असतांना भरल्या ताटावर जेवनाकरिता बसले होते परंतु सदर घटनेची माहिती कळताच ताट बाजूला करून आपल्या कर्तव्यवार रूजु झाले.

मुरबाड ग्रामीण रूग्णालयातील कर्तव्यावर जबाबदारी पार पाडणारी टिम - डॉ.संग्राम डांगे (वैद्दयकिय अधिक्षीक) ,डॉ.शंकर सुतार,डॉ.स्वप्निल वाकचौरे,डॉ.प्रविण सर्जन,डॉ.ठमके मॅडम,डॉ.विश्‍वकर्मा,सर्व अधिपरिचारिका,परिचारिका,108 रूग्णवाहिका सेवक,कर्मचारी,शिपा,सफा कामगार.

  ------------------------------------------------------------------------------------------------

त्या आची तिन्ही मुलांचे या अपघातात निधन -

रायता पुलावरील को कालीपिली व डंपरच्या धडक भिषण अपघातात मुरबाड तालुक्यातील पर्‍हे गावातील एकाच कुटूंबातील भाऊ व बहिणींचा दुर्देवी मृत्यु झाले असून त्यांना वडिल या जगात हयात नव्हते त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांच्या आने केले होते.घडलेली घटना अत्यंत दुखः असून दोन मुली व अल्पवयीन मुलगा यांचे निधन झाले या घडलेल्या घटनेची बातमी सर्वांना हळहळ करून सोडली आहे.त्या आच्या जिवनात पती नंतर मुलांचा सहारा होता परंतु आज तोच सहारा आज नसल्याने त्या आवर दुखःचे पसरलेले डोंगर जगातील आच समजू शकते.

 पोलीसांचा चोख बंदोबस्त -

सदर घटना घडताच रायता पुलावर टिटवाळयाची पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी मदतीसाठी धावली.मुरबाडमध्येही ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात कोणतीही घटना घडु नये म्हणून मुरबाड पोलीसांनी चोख बंदोबस्त तैन्यात केला होता.

 मडकेपाडा येथे रिक्षाचा अपघात –

मुरबाड शिवळे रोड लगत मडकेपाडा गावालगत काल एका रिक्षाचाही अपघात घडला होता त्यांना मुरबाड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले असता या अपघातात कोणाच्याही जीवाला काहीही झाले नसून सुदैवाने त्यांचे जीव वाचले आहे.सदर अपघात अनियंत्रितपणाने वाहन चालवितांना झाले असल्याचे कळते.किरकोळ दुखापत असून शरीराचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याचे यावेळी डॉ.संग्राम डांगे यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.या अपघातात रामचंद्र भोसले,राहुल सांभरे,पुंडलीक भोसले,विमल मुकणे हे सर्व राहणारे पशेणी येथील असून त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे.

 धानिवली मिंडा कंपनीसमोर अपघाताची वार्ता -

काल मुरबाड कल्याण रोड लगत धानिवली येथील मिंडा कंपनीसमोर दुचाकीस्वाराचा अपघात झाले असल्याची माहिती फोटोसमवेत व्हाट्सअपवर फिरत होती सदर घटनेत कोणतीही किरकोळ दुखापत असून जीवितहाणी नसल्याचे कळते.

 पोटगांव रोडवर अपघात -

काल कल्याण दिशेकडे जाणार्‍या दुचाकी स्वाराचेही अपघात झाले असून त्याबबात सर्वत्र एक व्हिडीओ व्हॉट्सअपवर फित असल्याने आम्ही सदर अपघाताची माहिती मुरबाड ग्रामीण रूग्णालय तसेच मुरबाड पोलीस गोपनिय विभागाकडून प्राप्त केली असता सदर अपघाताची नोंद अथवा रूग्णांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले नसून कदाचित अपघात व्यक्ती सुदैवाने सुरक्षित असतील किंवा पुढील उपचाराकरिता कोणत्यातरी रूग्णालयात नेले असतील अशी चर्चा आहे.सदर घडलेला अपघात नेमकी कोणाचा झाला व कशामुळे झाला याची माहिती कळून आली नाही.

 गळफास घेऊन आदिवासी पुरूषाची आत्महत्या -

मुरबाडचा कालचा दिवस हा काळाच म्हणावं लागेल कारण कालच्या दिवशी झालेले अपघात,मृत्यु,आत्महत्या यांसह अन्य प्रकरणे ग्रामीण रूग्णालयात होती यावेळी डॉ.संग्राम डांगे यांनी पार पाडलेली चोखपणे जबाबदारी सर्वांनी प्रथमच पाहिली आहे त्यातच पोस्टमॉर्टमसाठीच एका आदिवासी पुरूषाचे प्रेत आले होते त्या मयताचे नाव शिमग्या कोंडु मुकणे (वय,22) असे असून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची सांगण्यात आले.मुरबाड ग्रामीण रूग्णालयात काल एकूण 6 जणांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले असल्याचीही माहिती वैद्दयकीय अधिक्षीक डॉ.संग्राम डांगे यांनी आमच्याशी बोलतांना दिली.

 ------------------------------------------------------------------------------------------------

भूषण घोरपडे भाऊसाहेब यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण -

मुरबाड तहसिल कार्यालयातील महसूल सहाय्यक म्हणून पदावर काम करणारे भूषण घोरपडे भाऊसाहेब यांचे रायता पुलावरील झालेल्या अपघातात निधन झाले असून या घटनेची माहिती मिळताच सर्व तहसिल कार्यालयातील कार्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.नेहमी सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असलेले घोरपडे भाऊसाहेबांची नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडली होती. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक माणसांच त्यांनी काम केले.कुठलीही अपेक्षा व्यक्त न करणारा सच्चा अधिकारी आज आपल्यात नसल्याचे दुखः सर्वांनाच आहे नशिबासमोर कोणाचं काहीही चालत नसते परंतु चांगल्या माणसाबरोबर अशी घटना घडणे हे परमेश्‍वरालाही पटलं नसावं.भाऊसाहेबांच्या कारकीर्दीत कोणालाही अपशब्द न वापरता कधीही दुखावले नाही.आहो साहेब मी बसलोय इथं तुमचं काही मी करून देणार त्याशिवाय घरी जाणार नाही अशी त्यांची माणूसकी आज काळाच्या पडद्दयाआड गेल्याने सर्वच अधिकारी,कर्मचारी,नागरिकांच्या डोळयातील अश्रृ त्यादिवशी थांबलेच नाही.परमेश्‍वर भाऊसाहेबांच्या आत्म्याला चिरशांती लाभो व त्यांच्या कुटूंबाला हे दुखः सावरण्याची शक्ती देवो यांसह भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

 आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केले दुखः -

रायता पुलावरील झालेल्या अपघातात सर्व निधन झालेल्या प्रवाशांच्या कुटूंबियांवरील हे दुखःचे डोंगर आले असून घडलेली घटना अत्यंत दुखःदायक आहे अशा निशब्द भावनेने आमदार किसन कथोरे यांनी मयत व्यक्तींच्या कुटूंबियांचे सांत्वन घालून मयत व्यक्तींच्या आत्म्याला चिरशांती लाभो व त्यांच्या कुटूंबाला हे दुखः सावरण्याची शक्ती देवो यांसह भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

 आमदार किसन कथोरे यांचे आवाहन -

आमदार किसन कथोरे यांनी सर्व वाहनचालकांना वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन केले असून आपली घरी कुटूंब वाट पाहत आहे याची कल्पना ठेवून उशीर होऊद्दया परंतु वाहने सावकाश चालवा असे आवाहनही केले.

रायता पुलावर गतिरोधक व हायस्पीड म्हणून सीसीटिव्ही बसवून वेग कमी करण्याची अ‍ॅड.किरण थोरात यांची मागणी -

मुरबाड कल्याण महामार्ग हा आता नॅशनल महामार्ग झाला असून या महामार्ग रस्त्यावर मुख्य वळणे असून तेथे वेगवान गाडयांची गती लावलेल्या हायस्पीड फलकापेक्षा जास्त आहे त्यामुळे नियमांना धाब्यावर बसविले असून सिसिटिव्ही नसल्याने अपघात होतात त्यामुळे आजच्या युगात व्यक्ती मरणाराला घाबरत नसून दंडात्मक चलणारा घाबरतो त्यामुळे अशा मुख्य वळणावर व रायता पुलावर हायस्पीड फलकाबरोबर सिसिटिव्ही बसविल्यास ऑनलान द्वारे हायस्पीड दंडात्मक चलन लावल्यास गाडीची गती चलन भरावे लागेल म्हणून कमी होल व अपघाताला आळा बसेल आणि त्यातच याच वळणाच्या ठिकाणी गतिरोधक बसवल्यास होणे अपघात भविष्यात टळू शकतील म्हणून केंद्र सरकारसह राज्य सरकारने महामार्ग यांना अपघात होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी अपघाती वळणावर हायस्पीड सिसिटिव्ही व गतिरोधक तात्काळ बसवावे अशी मागणी अ‍ॅड.किरण थोरात यांनी आमच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे.

 को कालिपिली गाडया बंद -

कालची घटना भयावह असून मुरबाड कल्याण धावणारी को कालिपिली गाडी बंद करण्यात आले असल्याचे कळते.कामासाठी कल्याणकडे प्रस्थान करणारे नागरिकांना बस आगारातुन आता या प्रवाशांसाठी किती बस उपलब्ध करून दिल्या जातील असा प्रश्‍न उपस्थित राहत आहेत.

 

Post a Comment

Previous Post Next Post