BIG BREAKING NEWS...

उत्कृष्ट जिल्हाशल्यचिकित्सक म्हणून डॉ.कैलास पवार यांना आरोग्य रत्न पुरस्कार प्रदान...

 

दि,25,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

दि.22/02/2026 रोजी मुंब येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आरोग्याचा ध्यास महाराष्ट्राचा विकास,वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार,महाआरोग्य सन्मान सोहळा 2026 पार पडला यामध्ये महाराष्ट्रातून ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांना उत्कृष्ट जिल्हाशल्यचिकित्सक म्हणून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न मानाचा पुरस्कार आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर मॅडम,आरोग्यमंत्री अशोक अंबिटकर,डॉ.कादंबरी बलकवडे मॅडम (एन.आर.एच.एम.महासंचालक),डॉ.नितीन अंबाडेकर (आरोग्य महासंचालक),मुंबईचे शिवसेना उपमहापौर संजय घाडी यांच्या सह अन्य प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

          डॉ.कैलास पवार यांनी जागतिक महामारी कोरोना काळात केलेल्या धडाडी कार्य केले त्यातच कोव्हीड लसीकरणासह रूग्णांची अत्यंत चांगल्या प्रकारे रूग्णसेवा केली याचा फायदा गोरगरिब सेलेब्रिटीपर्यंत सर्वांना मिळवून दिला असून इतर सर्व आजारांवर ग्रामीण भागात शासकीय रूग्णालयाच्या माध्यमातून उपचार उपलब्ध करून दिले.दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र आणि पुनर्वसन हे काम चांगल्या पध्दतीने सुरू करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात डॉ.पवार यांचं योगदान अनेकांना प्रेरणादायी ठरले आहे.राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात डॉ.पवार यांचा नेहमी सिंहाचा वाटा राहिला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हयात नेहमी सर्व प्रकाराचे आरोग्याचे शिबीर कार्यक्रम यशस्वीपणे राबविले गेले आहेत त्यांनी कधीही कोणावर राग व्यक्त केला नाही परंतु तत्वाशी हातमिळवणीही त्यांची कधी झालेली नाही.कुठल्याही रूग्णांना हवी मदत मिळावी म्हणून रात्री कितीही वाजता मोबालवर फोन केल्यास पहिल्याच रिंगमध्ये फोन ते उचलत असून जी हवी ती मदत त्यांच्या निढळ हातातून झालेली आहे.होणार नाही असा शब्दच त्यांच्या डिक्श्‍नरीमध्ये नाही.सर्वांना नेहमी मोलाचे मार्गदर्शन करित असतांना रूग्णांची सेवा ही इश्‍वर सेवा आहे हे माणूनच काम करा असे त्यांचे ब्रीद वाक्य अनेकांना सेवा करण्याची संधी देत असते.काम करा पण आनंदाने करा परंतु जनतेची सेवा करतांना आपल्याच कुटूंबातील सदस्य आहे हे माणूनच काम केलं पाहिजे अशी त्यांची शिस्त माणूसकी झरी जपणारा पारदर्शक बाणा त्यांचा सदैव राहिला आहे.मध्यस्थी त्यांच्या पायाला प्लास्टर असूनही स्वतः सुट्टी घेतली नाही केवळ आणि केवळ काम म्हणून या परिस्थितीतही त्यांनी महिनाभर रूग्णसेवा केली त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांतील सामान्य व्यक्तींनी आज मनाने मोठा भाऊ म्हणून मानतो.लोकांसाठी कल्याणकारी योजना आल्यावर त्याचा लाभ सर्व घटकांपर्यंत त्यांचा पाहोचविण्याचा मानस सर्वांना भावून जात आहे.नवीन रूग्णालय उभारणीबरोबर त्यामध्ये पदे निर्मितीसाठी डॉ.पवार यांनी घेतलेली मेहनत सर्वांनी जवळून पाहिली असून एक आदर्शच त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे.मिळालेल्या पुरस्कारसंदर्भात आम्ही प्रतिक्रिया घेतली असता सदर पुरस्कार हा केवळ माझा एकटयाचा नसून तो सर्वच डॉक्टर,परिचारिका,अधिकारी,कर्मचारी यांचा आहे त्यामुळे मी या सर्वांचा आभारी आहे की आपल्या ठाणे जिल्हयाला हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे.यावेळी डॉ.सौ.पवार मॅडम यांचीही प्रशस्तीपत्र स्विकारतांना उपस्थिती होती.सदरचा पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्व स्तरातून डॉक्टर, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार यांच्याकडून डॉ.कैलास पवार व सौ.पवार मॅडम यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

 ---------------------------------------------------------------------------------

सुप्रिया मोरे यांना " महाआरोग्य सन्मान 2026 " प्रदान

ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सिंगापूर ग्रामपंचायतील सुप्रिया मोरे यांना " महाआरोग्य सन्मान 2026 " प्रदान करून उत्कृष्ट आशा स्वयंसेविका म्हणून गौरविण्यात आले सदर असून पुरस्कार आरोग्यमंत्री प्रकाश अंबिटकर व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.सेवा,लसीकरण मोहिम,कुपोषण निर्मूलन,संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती याबरोबर त्यांनी विविध उपाययोजनांमध्ये त्यांची कामगिरी ही उल्लेखनीय ठरली आहे.

आरोग्य सुविधा तळागळात पोहोचवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांचे विशेष मार्गदर्शन नेहमी संबंधित कर्मचारी यांना मिळत असते त्यामुळे गावांगावात शासकीय योजनांचा लाभ पोहोचतांना दिसत आहे.त्यांचे अमुल्य योगदान मुरबाड तालुक्याचे नाव उंचशिखरावर गेले आहे.धसई प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सिंगापूर ग्रामपंचायतील सुप्रिया मोरे यांनी जी नागरिकांची सेवा केली त्याची दखल ही शाससाने घेतली आहे.या महाआरोग्य सन्मान कार्यक्रमाला मुरबाड तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे,मुरबाड तालुका समूह संघटक तुषार भालचंद्र म्हसे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post