दि,12,POL,मुरबाड -
दि.१० एप्रिल २०२६ रोजी सकाळी
१०.०० ते ०५.०० दरम्यान महसूल व वन विभाग,तहसील कार्यालय मुरबाड आणि सौ.कमलताई किसन
कथोरे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय म्हसा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या
प्रांगणात छत्रपती
शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत शासकीय दाखले वाटप शिबीर
घेण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट
आमदार किसन कथोरे तसेच मुरबाडचे तहसीलदार अभिजित देशमुख,महसूल नायब तहसीलदार अमोल शिंदे,निवासी
नायब तहसीलदार सुषमा आव्हाड-बांगर,महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश माळी सर,इतर शासकीय
अधिकारी उपस्थित होते.अतिथी मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराची सुरुवात
करण्यात आली.या प्रसंगी उपस्थित सर्व अतिथी मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.या
प्रसंगी किसन कथोरे साहेबांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.आमदार कथोरे साहेबांच्या
हस्ते काही दाखले वाटप देखील करण्यात आले.या शिबिरात उत्पन्न,रहिवास, अधिवास,नॉन क्रेमिलयेर,जातीचे
प्रमाणपत्र असे विविध दाखले तसेच शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली.म्हसा
आणि आसपासच्या गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा
लाभ घेतला.सुमारे १६८ दाखले यावेळी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रा.कन्या हरड मॅडम यांनी केले.


Post a Comment