Header Ads Widget

Responsive Advertisement

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात कंगारू मदर केअर प्रशिक्षण कार्यक्रम...

 

दि,16,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड ग्रामीण रुग्णालयात "कंगारू मदर केअर" या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन  दिनांक १२ जून २०२५रोजी करण्यात आले.हा कार्यक्रम कर्नाटका हेल्थ प्रमोशन ट्रस्ट (KHPT)यांच्या सहकार्याने राबवला गेला. कार्यक्रमात डॉ. संग्राम डांगे (वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय मुरबाड जिल्हा-ठाणे यांनी कंगारू मदर केअरच्या पद्धतींवर मार्गदर्शन केले. या पद्धतीमध्ये नवजात कमी वजनाचे शिशुंना त्यांच्या आईच्या अंगावर ठेवून शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारले जाते तसेच त्यांचे वजन वाढून सुदृढ होतात.कांगारू मदर केअर प्रशिक्षणाद्वारे रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी नवजात शिशुंच्या काळजीसाठी सज्ज झाले आहेत. यामुळे शिशुंच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल, त्यामुळे भिवंडी मधील सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्या नवजात शिशूना कांगारु मदर केअर पद्धतीचा खूप फायदा होणार आहे अशी खात्री आहे.प्रशिक्षणामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रशिक्षण कार्यक्रमाला KHPT चे डॉ. सारिका कंग्राळकर Facility Coordiator तसेच श्री.जय मोरे Project Officer श्रीमती.छाया पाटील Peer Educator यांचाही सहभाग होता.

Post a Comment

0 Comments