Header Ads Widget

Responsive Advertisement

म्हसा विद्यालय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर…

 

(दि.20,POL - मुरबाड)

दि.18 रोजी बदलापुर येथे शिवभक्त विद्यामंदिर,वडवली येथे जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा संपन्न झाल्या.यात  म्हसा येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय, म्हसा या शाळेने सहभाग घेतला.(14 वर्ष वयोगट मुलींचा संघ)पहिला सामना अंबरनाथ विरुद्घ झाला.यात म्हसा विद्यालय जिंकून फायनलचा सामना शिवभक्त विद्यामंदिर वडवली शी खूप जोमात रंगला.या सामन्याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून होते.शेवटी म्हसा विद्यालयास दुसरा क्रमांक मिळाला.(उपविजयी ठरला.)

               कार्यक्रम प्रसंगी कोकण विभागातील शिक्षक आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर,प्रा डॉ चंद्रमणी मोहिते, अंबरनाथ क्रीड़ा तालुका प्रमुख विलास गायकर, मुख्याध्यापक पंढरीनाथ म्हसकर, क्रीड़ा शिक्षक भानुदास लोहार, क्रीड़ा शिक्षक देशमुख,महिला प्रतिनिधी धनश्री साबळे, शिवळे येथील श्री खापरे व विशे भाऊ, तालुक्यातील व जिल्ह्यातील सहभागी विद्यार्थी व क्रीड़ा शिक्षक उपस्थित होते.सर्व सामने संपल्यानंतर लगेच त्याच ठिकाणी बक्षीस समारंभ संपन्न झाला. यात दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस म्हसा विदयालयास प्राप्त झाले.

 

Post a Comment

0 Comments