Header Ads Widget

Responsive Advertisement

उद्धव ठाकरे यांचे मिशन कोकण ; वंदे भारतने करणार प्रवास....

 

 (दि.28,POL - मुंबई)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवशी या दौऱ्यात स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांसोबत आगामी निवडणुकीची रणनीती ते तयार करणार आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि नारायण राणे यांच्या मतदार संघावर उद्धव ठाकरे लक्ष केंद्रीत करणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे आंगणेवाडी भराडीदेवीचे दर्शन घेणार आहे. दौऱ्यात 4 फेब्रुवारीला सिंधुदुर्गात शिवसैनिकांशी संवाद साधणार आहे. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे. तर 5 फेब्रुवारीला बारसु येथे भेट देणार आहे. या दिवशी त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. दौरा संपल्यानंतर वंदे भारत रेल्वेने उद्धव ठाकरे प्रवास करुन पुन्हा मुंबईत येणार आहे.

Post a Comment

0 Comments