Header Ads Widget

Responsive Advertisement

मुरबाड ग्रामीण रूग्णालयातील अफरातफर केलेल्या भंगार विक्री कमिटी गायबच ?

 

(दि.28,POL - कुणाल शेलार, मुरबाड)

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात तत्कालीन अधिकारी यांनी भंगार विक्रीत अफरातफर करून तत्कालीन अधिकारी यांची बदली झाली आहे.यासंबंधी तक्रारीच्या अनुषंगाने ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक यांच्या अधिपत्याखाली कमिटी गेल्या 8 ते 9 महिण्यांपुर्वी गठित करण्यात आली असून सदर कोणतीही कार्यवाही न करता सदरची कमिटी गायबच झाली असल्याची चर्चा आता रंगू लागली असून अधिकारी वर्ग अधिकारी वर्गाला वाचविण्यासाठी चालढकल करित असल्याचे बोलले जात आहे.हजारो लाखो रूपयाच्या अफरातफरेत शासनाने यासंबंधी त्या तत्कालीन अधिकारी यांची आर्थिक गुन्हे शाखा व खातेनिहाय चौकशी करून भ्रष्ट अधिकारी यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणून दयावा अशी मागणी तक्रारदार येत्या दिवसांत लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री,आरोग्यमंत्री यांना देणार असल्याचे कळून येत आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयात देखावा करून निष्पाप नवजात बालकाचा पोटातच जीव जाणार्‍याला कारणीभुत असलेल्या अधिकारी याला अधिकारी वर्गच का पाठीशी घालत आहे असा सवाल कमिटी निर्गमित करून देण्याची मागणी करणारे तक्रारदार यांनी शासनाला केला आहे.यासंबंधी 15 दिवसांत कमिटी सज्ज झाली नाही व तारिख पे तारिख केल्यास स्थगित झालेले उपोषण पुन्हा करण्यात येर्इल असा इशारा पुन्हा दिला आहे.त्यामुळे गायब झालेली भंगार विक्री कमिटी 15 दिवसांत येर्इल की उपोषण करण्याची वाट बघेल याकडे आता लक्ष लागून आहे.

Post a Comment

0 Comments