Header Ads Widget

Responsive Advertisement

28 वर्षांनंतर रायते हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह-संमेलन उत्साहात साजरा...

( दि.15,POL - रायता )

दि.१० फेब्रुवारी, पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ भिवंडी संचालित रायते विभाग हायस्कूल रायते, या शाळेतील सन १९९५-९६ या वर्षी १० वी. मध्ये असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह संमेलन कार्यक्रम नुकताच रायते हायस्कूलमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी जवळपास ४६ विद्यार्थी उपस्थित होते. इतक्या वर्षांनंतर पुन्हा तीच शाळा, तोच वर्ग आणि तेच मित्र भेटल्यानंतर मित्र-मैत्रिणींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शाळेत बेंच वर बसल्यानंतर शिक्षकांनी घेतलेल्या हजेरीमुळे तर सगळ्यांना शाळेतील ते जुने दिवस आठवले. यावेळी शाळेतील मुलांसाठी कॅरमबोर्ड, बॅटमिंटन, व्हॉलीबॉल, चेस, बॅट-बॉल इत्यादी खेळाचे साहित्य शाळेचे मुख्याध्यापक सी.एस. पाटील आणि पर्यवेक्षिका माळी मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

 त्यानंतर एका फार्म हाऊसवर सगळ्यांनी एकत्रित येऊन स्नेह-संमेलन साजरा केला. प्रत्येकाने आपापले अनुभव कथन केले, त्याचबरोबर गाणी, खेळ, काव्य वाचन, मस्ती आणि न संपणाऱ्या गप्पा मारत स्नेह-भोजनाचा आस्वाद घेतला. अशा या खेळीमेळीच्या वातावरणात सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता. त्यानंतर आलेल्या प्रत्येकाला ग्रुपचा फोटो आणि आठवण म्हणून भेटवस्तू देऊन "आपण सगळ्यांनी पुढच्या वर्षी लवकर भेटूया"  म्हणत एकमेकांचा निरोप घेतला. 

          या कार्यक्रमाची संकल्पना आणि नियोजन उमेश ठाकरे, वामन भोईर, आशालता वाळिंबे (खापरे) यांनी उत्तम पद्धतीने केले होते.

Post a Comment

0 Comments