Header Ads Widget

Responsive Advertisement

म्हसा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

(दि.21,POL, म्हसा -)

फेब्रुवारी रोजी वीर हुतात्मा भाई कोतवाल व कनिष्ठ महाविद्यालय, म्हसा (ता मुरबाड) येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

       प्राचार्य डॉ चंद्रमणी मोहिते यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन करण्यात आली. या वेळी भाषणे,गाणी,पोवाड़े, कविता,घोषवाक्य विद्यार्थ्यांनी सादर केली. आंबेगावचे ग्रामस्थ भगवान घरत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र बेन्द्रे यांनी केले.यानंतर शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, मावळे या वेशभूषेत ढोल,लेझिम ताशाच्या गजरात मोठ्या जल्लोशात गावात थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली.

        बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन प्रा.डॉ.मोहिते यांनी केले. या वेळी सौ.सुरेखा कराळे यांचे शिवचरित्रावर भाषण झाले.पत्रकार विनायक ढमणे,भिमा कुर्ले,धनाजी घागस,चिमन कुर्ले,महादु कुर्ले ,ग्रामस्त उपस्थित होते.सुनिल रेंघे,बी.डी.लोहार व सौ धनश्री साबळे यांनी लेझिम पथकाचे आयोजन केले.परते सर,भानुदास घागस,सौ विद्या बैरागी,सौ.गोडांबे,सौ चौधरी,पुजा कुर्ले ,मधुकर कुर्ले,सुवर्णा इसामे,रमा बाई पष्टे, ग्रामस्थ बंधु-भगिनी व पालक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments