Header Ads Widget

Responsive Advertisement

' उडान ‘ महोत्सवात शिवळे महाविद्यालयातील मानसी गडगे वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

(दि.03,POL- मुरबाड)

मुंबई विद्यापीठाच्या ‘आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागामार्फत’(DLLE) उल्हासनगर येथील एस. एस. टी महाविद्यालय मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक ‘उडान’ महोत्सवामध्ये शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीराम भाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे येथील TYBAF मधील विद्यार्थिनी कु.मानसी अशोक गडगे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल)संपादित केला.‘ सेव फुड’ (Save food) या विषयावर मानसी गडगे हिने आपलें  वक्तृत्त्व  सादर केले. या स्पर्धेसाठी तिला महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग प्रमुख डॉ.एल.आर.संते व प्रा.आर.डी.वर्मा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. गोटीरामभाऊ पवार साहेब, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.जी.आर.विशे,सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments