महाराष्ट्राचे लाडके आमदार किसनराव कथोरे यांच्या मागणीला यश ; ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत” जाचक अटी शिथील…

 

(दि.04,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेंतर्गत महिलांना 1500 रूपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असता यामध्ये जाचक अटी टाकण्यात आले होते.सदर अटीत अधिवासी दाखला,उत्पन्न दाखला प्रामुख्याचा मुद्दा लक्षात घेता केवळ 15 दिवसाची मुदत परंतु सदर दाखले महिलांना 15 दिवसांत मिळणे शक्य नसल्याने याकडे महाराष्ट्राचे लाडके आमदार किसनराव कथोरे यांनी लक्ष वेधून सदर जाचक अटी शिथील करावे म्हणून मागणी केली.या मागणीची दखल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी घेऊन सुधारीत निवेदन विधानसभेत करून जाचक अटी शिथील करित 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची मुदतवाढही देण्यात आली आहे.आमदार किसनराव कथोरे यांच्या मागणीला अखेर यश प्राप्त झाल्याने राज्यातील महिला भगिनींनी श्री.कथोरे यांचे आभार मानले आहेत.तसेच जाचक अटीमध्ये महत्वपूर्ण आता 21 ते 65 वयोगटातील कुमारिका व महिलांना सुध्दा अवश्यक कागदपत्र तयार करून ग्रामपंचायत कार्यालय,ग्रामसेवक यांच्या माध्यमातून सदर योजनेकरिता अर्ज किंवा माहिती भरणेबाबत जनजागृती करून ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गतकोणतीही महिला वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी काही अडचण उद्भवल्यास किंवा फॉर्म भरण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणी पैशाची टाळाटाळ केल्यास थेट लाभार्थी महिलांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार किसनराव कथोरे (9422073551) यांनी केले आहे.

------------------------------------------

फॉर्म भरण्यासाठी अवश्यक ते कागदपत्रे -

1.       योजनेचे फॉर्म

2.       आधारकार्ड

3.       जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा दोन्ही नसल्यास ग्रामीण रूग्णालयातील वैद्दयकीय अधिकारी यांनी दिलेला वयाचा दाखला

4.       रेशनकार्ड ची झेरॉक्स प्रत

5.       लाभार्थी नावाने बँक खाते पासबुक झेरॉक्स

6.       जमिनीची अट शिथील झाली आहे.

------------------------------------------

अधिक माहितीकरिता संपर्क - 

बदलापूर -  प्रकाश (मो.नं.9850499228)

मुरबाड  -   निलेश गायकर (मो.नं.9270011965)

              गणेश लाटे (मो.नं.8369742425)

कल्याण  - रविंद्र घोडविंदे सर (मो.नं.9619188558)

------------------------------------------

अंगणवाडी सेविका व मदतीनस यांनी या योजनेंतर्गत 100 टक्के नोंदणी चे उद्दिष्टे देण्यात आले असून सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची नोंदणी सदर नारी शक्ती दुत अॅप मध्ये करून अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post