श्री.किसन कथोरे मित्र मंडळाच्या वतीने मुरबाड तालुक्यातील माता भगिनींसाठी श्री क्षेत्र ञ्यंबकेश्वर दर्शन तीर्थ यात्रेचे आयोजन

 

(दि.07,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

मुरबाड तालुक्यातील माता आणि भगिनींसाठी श्रावण मास विशेष म्हणून आमदार किसनराव कथोरे यांच्या स्नेही नागरिकांनी श्री.किसन कथोरे मित्र मंडळाची स्थापना केली आहे.या मंडळाच्या वतीने धार्मिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,आरोग्य शिबीरे,सामाजिक माध्यमातून विविध असे उपक्रम नागरिकांसाठी राबविले जात असतात. श्रावण मास महिणा सुरू झाल्याने या निमित्ताचे औचित्य साधत मुरबाड तालुक्यातील माता आणि भगिनींसाठी श्री क्षेत्र ञ्यंबकेश्वर दर्शन तीर्थ यात्रेचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील गावातील जिल्हापरिषद गटवारीनुसार या यात्रेचे 5 टप्पे करण्यात आलेले आहे.त्यापैकी 1) आज बुधवार दि.7 ऑगस्ट 2024 रोजी शिरवली व डोंगरन्हावे जि..गटातील महिला वर्ग,2)मंगळवार दि.13 ऑगस्ट 2024 रोजी देवगांव व कुडवली जि..गटातील महिला वर्ग,3) बुधवार दि.21 ऑगस्ट 2024 रोजी सरळगांव व धसर्इ जि..गटातील महिला वर्ग,4) शुक्रवार दि.23 ऑगस्ट 2024 रोजी मुरबाड शहरातील सर्व महिला वर्ग,5) बुधवार दि.28 ऑगस्ट 2024 रोजी वैशाखरे व माळ जि..गटातील महिला वर्ग अशी रूपरेषा तीर्थ दर्शनाची ठरवलेली असून या तीर्थयात्रेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक गावागावातील मंडळाचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांमार्फत प्रवेश पत्रिका भरण्यात येणार आहे.सदर प्रवेशपत्रिका भरल्याशिवाय तीर्थ यात्रेत सहभागी होता येणार नाही असे सांगण्यात येत असून अधिक माहितीकरिता या मंडळाचे अध्यक्ष श्री.गणेश लाटे (मो.नं.7030582224),सचिव श्री.निलेश गायकर (मो.नं.9270011965) यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post