Header Ads Widget

Responsive Advertisement

हरिश्चंद्र खापरे सर यांचे घरातील दिड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन...

 

(दि.09,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

विद्दयामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्दयालय शिवळे येथील सेवानिवृत्त प्राचार्य हरिश्‍चंद्र विठ्ठल खापरे यांच्या घरी नवसाला पावणारा मुकुटधारी दिड दिवसाच्या गणपती बाप्पाचे काल विसर्जन करण्यात आले.मुख्यतः सांगायचं झाले तर सदर बाप्पाची मुर्ती ही पुर्णतः मातीची असून घराच्या परिसरातच कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले आहे.दरवर्षी मोठया थाटामाटात गणरायाचे आगमन होत होते परंतु यावर्षी श्री.खापरे सरांच्या मातोश्री यांचे वयोवृध्दाने निधन झाल्याने साध्या पध्दतीने परंपरा जोपासून यंदाचा गणपती उत्सव घरातच साजरा करण्यात आला.दरवर्षी असंख्य गणेशभक्तांची गर्दी श्री.खापरे सरांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेण्याकरिता येत असते.परंतु दुःख पाळण्याची आपली प्रथाही आहे ते विसरता येणे नाही.श्री.हरिश्‍चंद्र खापरे सर,प्रा.निलेश खापरे सरांच्या या गणपती विसर्जनाचा संदेश तमाम गणेशभक्तापर्यंत पोहोचला कि मातीची मुर्ती घरात आणून कृत्रिम तलावात विसर्जन करून सदर मातीसह पाणी वृक्षाला देऊन त्यातून नव्या बिजेचे अंकूर पालवे फुले फळे निर्माण करणे,मुर्तीची अवहेलना न करता या पध्दतीने आपण मातीची गणपती बाप्पाची मुर्ती आणून कृत्रिम तलावात विसर्जन केल्याने आनोखा संदेश जनतेपर्यंत प्रामाणिकपणे संस्कार परंपरा जोपासण्याचा प्रयत्न आहे.श्री.हरिश्‍चंद्र विठ्ठल खापरे यांच्या अनोख्या संदेशाची चर्चा सध्या तालुक्यासह जिल्हयात होत आहे.

 

Post a Comment

0 Comments