Header Ads Widget

Responsive Advertisement

उद्या " वारी " चित्रपटाचे आमदार किसनराव कथोरे यांच्या शुभहस्ते मुहूर्त

दि.30,POL,कुणाल शेलार,मुरबाड - 

राज फिल्म्स अँड डिस्ट्रिब्युशन प्रस्तुत "वारी" प्रवास ओढीचा, विठ्ठलाच्या गोडीचा या चित्रपटाचे शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राचे लाडके मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते व आमदार सुलभताई गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दि.३१/०३/२०२५ रोजी सकाळी १०:३० वा.मंगरूळ येथे संपन्न होणार आहे. या चित्रपटाचे नाव वारी असल्याने या चित्रपटात नेमकी कशावर व कोणती कहाणी मांडली आहे याची उत्सुकता वारकरी, टाळकरी, माळकरी,भक्तगण, नागरिकांना असून या चित्रपटाची आतुरता सर्वांनाच लागली आहे. या चित्रपटाचे निर्माता श्री. राजेश सावळाराम पाटील हे असून यार चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळे हे असून छायाचित्रकार योगेश कोळी,कार्यकारी निर्माता महेश चाबुकस्वार,संयोजक - विजय कांबळे आहेत.या चित्रपटात प्रसाद ओक,वैभव मांगले,गणेश यादव,प्रणव रावराणे,जयेश पाटील,अभिनेत्री ईश्वरी देऊळकर,हर्ष दानवे हे अभिनेत्री आपली भूमिका साकारणार असून उद्याच्या या कार्यक्रमास अभिनेता,अभिनेत्री उपस्थित राहणार असून यार कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन या चित्रपटाचे निर्माता श्री.राजेश पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments