Header Ads Widget

Responsive Advertisement

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी शंकर करडे तर मुरबाड तालुका अध्यक्षपदी दिलीप पवार यांची निवड...

 

दि,28,POL,मुरबाड -

पत्रकारांच्या हक्काची नोदणीकृत संघटना असणाऱ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या सुचने नुसार या संघाच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार शंकर महादेव करडे यांची तर मुरबाड तालुका अध्यक्षपदी पत्रकार दिलीप अनंत पवार यांची आज  प्रदेश संघटक नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.तर या प्रसंगी ठाणे जिल्हा पदाधिकारी व मुरबाड,शहापूर,कसारा,भिवंडी,कल्याण ग्रामीण तालुका पदाधिकाऱ्यांना ही संघाचे प्रदेश संघटक नितीन शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई कडून देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात दिलेले प्रशंसनीय योगदान आणि पत्रकार हितासाठी काम करण्याची तुमची आवड लक्षात घेऊन,संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.वसंतराव मुंडे यांच्या सुचनेनुसार व कोअर कमिटीने घेतलेल्या सर्वानुमते निर्णयाच्या आधारे तुमची संघटनेच्या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या माध्यमातून तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडाल.तुमच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडावी अशी अपेक्षा आहे.संघटना मजबूत करण्यासाठी मोलाचे योगदान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

मुरबाड येथील शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथील हॉल मध्ये पार पडलेल्या नियुक्तीपत्र प्रदान समारंभात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघटक नितीन शिंदे यांनी कोकण विभाग उपाध्यक्षपदी संदीप पालवी,ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी शंकर करडे,भगवान फर्डे - ठाणे जिल्हा उपाध्यक्ष,संतोष राऊत - ठाणे जिल्हा संघटक, रमाकांत पालवे ठाणे जिल्हा - सचिव,मुरबाड तालुका अध्यक्ष दिलीप पवार, तालुका सचिव संजयजी बोरगे,उपाध्यक्ष सुभाष जाधव,कार्याध्यक्ष विलास जाधव,व्हिडिओ डिजिटल मीडिया मुरबाड तालुका अध्यक्षपदी युवा पत्रकार चेतन सुधीर पोतदार,मुरबाड तालुका प्रसिद्धीप्रमुख रोहित झुंझारराव,बदलापूर तालुका अध्यक्षपदी तुषार डबरे यांची निवड करण्यात आली.या नवनियुक्त कार्यकारणी मुळे ठाणे जिल्हात संघटनेला निश्चितच बळ मिळेल.

Post a Comment

0 Comments