Header Ads Widget

Responsive Advertisement

तेजस वसंत भगत 10 वी परिक्षेमध्ये उत्तीर्ण...

 

दि,13,POL, कुणाल शेलार,मुरबाड –

कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथील नांदप गावातील जनसेवक,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार श्री.वसंत मुकूंद भगत यांचे सुपुत्र कु.तेजस वसंत भगत याने 10 वी बोर्डाच्या परिक्षेत बाजी मारली आहे.आई वडिलांनी तेजस याच्या शिक्षणासाठी घेतलेली मेहनत त्याला ज्ञात होती.आपण 10 वी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालोच पाहिजे असे ध्येय मनाशी बाळगून यंदाच्या 10 वी मध्ये प्रवेश घेत परिक्षा दिली आणि त्याने सुयश मिळवून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.त्याच्या यशाने भगत परिवारासह मित्र परिवार,गावातील नागरिकांकडून तेजसला अभिनंदनपूर्वक पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments