Header Ads Widget

Responsive Advertisement

ठेकेदार जोमात अन तक्रारदार कोमात

 


दि,01,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

अनेक भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी ठेकेदारावर तक्रारदार करित असून अधिकारी नेहमी ठेकेदाराने टक्केवारी दिल्याने पाठराखण करित असतो त्यामुळे ठेकेदार जोमात अन तक्रारदार कोमात असतो.जो भ्रष्टाचारावर तोंड उघडून बोलतो त्याचे तोंड पाकीटाचे कलर दाखवून बंद केले जाते.त्यामुळे भ्रष्टाचार बाहेर काय मात्र येण्यास तयार नसतो परंतु काही जण सत्याची पाठराखण करतात ते काढतात परंतु त्यांच्या तक्रारीवर पांघरून घालण्याचे काम केले जाते अशी ही बाब संपुष्टात येणं गरजेचं असून विकासाच्या गतीला चालना मिळेल.जे मी बोलतो तेच करतो असे गुण अंगी बाळगळे तर निश्‍चित स्वरूपातच न्याय मिळेल अन्यथा हम लढते है,तुम कपडे संभालो अशी अवस्था निर्माण होर्इल यात शंका नाही त्यामुळे खर्‍या अर्थाने भ्रष्टाचार करणार्‍या ठेकेदारावर कारवार्इ करून त्यांना काळया यादीत टाकावे अशी मागणी उदयास यायला वेळ लागणार नाही.अधिवेशनात कित्येक ठेकेदारावर काळया यादीत टाकण्याच्या प्रश्‍नावर निर्णय देण्यात आला परंतु लोकल ठेकेदार मनमानीने टक्केवारी दिली असे समजून आशिर्वाद आपल्या पाठिशी आहे म्हणून भ्रष्टाचाराचा धनी होतो आणि तक्रारदाराच्या हिस्साला शनी येतो अशी अवस्था झाली आहे.कालपर्यंत ट्रेनने जाणारा ठेकेदार आज मोठया गाडीतून उतरतो म्हणजेच कुंपणच शेत खातंय यात शंका नाही.

 

Post a Comment

0 Comments