Header Ads Widget

Responsive Advertisement

सर्व पक्षांची दारे फिरून आले कोणीच उभे न केल्याने मुरबाड परिवर्तन पॅनेल काढला ; राजेश पाटील यांची त्या बंडखोर नगरसेवकांवर सडकुन टिका

 

दि,16,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

राम दुधाळे हा कधीच कोणाचा झाला नाही. आजपर्यंत त्याचा इतिहास बघितला तर त्यांनी अनेकांशी गद्दारी केली आहे हे मी सांगण्याची गरज नाही मुरबाड करांना माहित आहे.मागिल नगरपंचायत निवडणूकीला एक तास अगोदर भाजपचा अर्ज मी त्याला दिला व निवडुनही आणला, त्याच बरोबर विरोध असतानाही  व इतरांवर अन्याय करून पहिला नगराध्यक्ष बनविला पण त्याला जाणीव नाही.लायकी नसणाऱ्यांना मोठ मोठी पद दिली ती कथोरे साहेबांनी आणि आज हे आरोप करतात हे यांच षडयंत्र आहे. यांना कोणीतरी फुस लावली आहे. आम्हांला निधी दिला जात नाही असे त्यांचे जर म्हणने असेल तर मग आज नगरपंचायत मधील 17 वार्डात जी विकासाची कामे झाली आहेत ती कुणी केली.त्यांना निधी कोणी दिला हे जनतेला माहित आहे.अनेक दिवस इतर पक्षाची दारे फिरून आले कोणीच विचारत नाही म्हणून परिवर्तन पॅनेल काढला असला तरी मुरबाड मधील जनतेला हे आवडले नाही. जनता यांना यांची जागा दाखवेल अशा शब्दात टि.डी.सी बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना टिका केली.त्यांच्यावर काय अन्याय झालाय यासाठी आम्ही समोरा समोर बसायला तयार आहोत चर्चा करू असे खुले आवाहन त्यांनी बंडखोरी केलेल्या त नगरसेवकांना केले आहे.मी किंवा कथोरे साहेब कधीच त्या नगरपंचायत मध्ये जात नाहीत किंवा त्यांच्या कामात हस्तक्षेप करत नाही परंतु हे बिनबुडाचे आरोप आम्ही सहन करणार नाही. येणार्या नगरपंचायत निवडणूकीत यांचा करेक्ट कार्यक्रम होईल व जनता विकास पुरूषा सोबत आहे हे सांगण्याची गरज नाही अशी परखड भुमिका त्यांनी यावेळी मांडली.

Post a Comment

0 Comments