Header Ads Widget

Responsive Advertisement

मुरबाड तालुक्यातील आरोग्य सुविधा सुरळीत करण्याची मनसेची मागणी

 

दि,20,POL,मुरबाड -

मुरबाड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अत्यंत दयनीय अवस्थेत सुरू आहे याचा प्रत्यय मुरबाड तालुक्यात अनेक वेळा दिसून आला आहे.  काही दिवसापूर्वीच मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांचा सर्प दंशाने मृत्यू झाला तसेच आता पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात व विशेष करून आदिवासी वस्ती वाड्यांमध्ये आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात या अनुषंगाने मुरबाड तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र मधील आरोग्य सेवा सुरळीत सुरू करून तेथे योग्य तो औषध साठा उपलब्ध करून द्यावा यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण मुरबाड शहर शिष्टमंडळाने तालुका आरोग्य अधिकारी श्रीधर बनसोडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. व आरोग्य व्यवस्था व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची औषध साठा तसेच सर्पदंश यावर औषध उपलब्ध करण्यासाठी चर्चा केली.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुरबाड शहराध्यक्ष देवेंद्र जाधव, संघटक कीर्ती गोहिल, वार्ड क्रमांक १३ अध्यक्ष विकास गुप्ता, करवळे विभाग अध्यक्ष कैलास भावार्थे, सुजित टेकडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments