आजपासून म्हसा यात्रेला सुरूवात ; तहसिलदार अभिजीत देशमुख यांच्या परिवाराकडून खांबलिंगेश्वर देवस्थान मंदिर येथे पुजा संपन्न...

 

दि,03,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात म्हसा येथे सर्वात मोठी यात्रा प्रसिध्द असून ती भरत असते यावेळी सर्वच प्रशासनानी तंतोतंत नियोजन करून सदर म्हसा यात्रा कायदा व सुव्यवस्थेत व कुठेही गालबोट न लागता पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे.याच म्हसा यात्रेला आज दि.03/01/2026 रोजी सुरूवात होत असून या म्हसा यात्रेला मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख व त्यांच्या पत्नी सौ.देशमुख मॅडम यांना सकाळी पहाटे खांबलिंगेश्‍वर देवस्थान मंदिर म्हसा येथे शासकीय पुजा करण्याचा मान मिळाला असून म्हसा यात्रेला प्रारंभ झाले आहे.

मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख यांचे पारदर्शक कार्य सर्वांना ज्ञात असून नेहमी हसरा चेहरा परंतु कायद्दयाच्या चौकटीत राहूनच काम करणार अशी त्यांची भूमिका सर्व नागरिकांनी पाहिली आहे.मुरबाड तालुक्याचे भूमिपुत्र म्हणून त्यांना मुरबाड तालुक्याचा इतिहास माहिती आहे त्यामुळे प्रशासक म्हणून ते मुरबाड तहसिलदार म्हणून आल्याने सर्व मुरबाडकरांनी त्यांचे कौतुकही केले होते.

सुरू झालेले म्हसा यात्रा सुखरूप पार पडावी म्हणून म्हसोबा देवाचे दर्शन घेत साकडे घातले असून मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख व त्यांच्या सर्व देशमुख परिवाराकडून सर्व भाविकांना व ग्रामस्थ नागरिकांना शुभेच्छाही आमच्या माध्यमातून दिल्या आहेत.त्याचबरोबर आज मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख यांचे वाढदिवस असून त्यांना दिर्घायुष्य लाभो,त्यांच्या हातुन जनसामान्यांसाठी सत्कर्म कार्य घडत राहो याच आमच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

 

 

 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post