आमदार किसनजी कथोरे अजय कर्मयोद्धा ; मंत्रीपद तर मिळायलाच हवं- एकनाथ देसले

 

(दि.05,POL,मुरबाड)

       महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली आणि आमदार किसनजी कथोरे यांनी अर्ज दाखल केला ही बातमी मराठी,हिन्दी,इंग्रजी राज्यातीलच किंवा देशातील वृत्तवाहिन्यांवर नव्हे तर आंतर्राष्ट्रीय वाहिन्यांवर बातमी झळकली. त्याचदिवशी, त्याक्षणीच अखिल जगताला ह्या दृढनिश्चयी नेत्याची  उंची लक्षात आली.हो...हा क्षणच खरंतर त्यांच्या परमोच्च कामगिरीला सलाम करणारा होता. सर्वसामान्य ,राजकिय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात जन्माला येवुन असामान्य कर्तृत्वानं सामान्यांच्या गळ्यातला ताईत झालेला हा असामान्य नेता,जनमानसातला लोकमान्य, लोकनेता !

     तब्बल पाच वेळा सतत आमदार म्हणून निवडून येणारा ठाणे जिल्हयातील कर्मयोगी नेता ! विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी नाव जाहिर होतं तर मंत्रीपद तो बनताच है ना?

"महाराष्ट्राचा शिरोमणी अन् सह्याद्रीचा राजा,

भूतकाळाचा बोध घेवुनी वेध भविष्याचा"

    ह्या उक्तीनुसार ताठ मानेनं जगणारा लोकनेता.आपल्या उत्तुंग शिखरावर झेप घेत असतांना त्यांनी पायाखालील जमीनीशी कधीच फारकत घेतली नाही.कारण गोरगरीब, आदिवासींच्या दुःखाचं निरसन करतांना त्यांनी स्वतःच्या जीवनातील आनंदी क्षणही पायदळी तुडवले.

   सरपंच, सभापती,जिल्हाध्यक्ष, आमदार, अशी यशाची शिखरे सर करत असतांनाच तळागाळातील जनतेचा उत्कर्ष हाच हेतु मनात ठेवून विकासाला गवसणी घातली."विकासाचे वारे,किसनजी कथोरे" हे घोषवाक्य वाऱ्यासारखे चौफेर निनादले ते उगाच नाही.

   आपल्या कर्मभूमी व जन्मभूमीवर विशेष श्रद्धा ठेवून अखिल महाराष्ट्रात आपला विधान सभा मतदारसंघ अव्वल राहील हाच ध्येयवाद ठेवून त्यांनी असामान्य कर्तृत्व सिद्ध केलंय. समस्यांचं उच्चाटन करुन  अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावून लावले. त्याचा सार्थ अभिमान आज मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर मधील जनतेला आहे.त्यांनी केलेल्या उपक्रम, योजनांचा उल्लेख करावयाचा झाल्यास महाराष्ट्रातील सर्वात जास्त योजनांना "मूर्त" स्वरूप देणारा आमदार म्हणून त्यांच नाव घ्यावे लागेल.

    त्यांना खूप लोक आदराने "आप्पा" म्हणतात. आप्पा हा आदरयुक्त शब्द काका किंवा आजोबांना स्नेहभावाने आणि निश्चित आधारस्तंभ म्हणून वापरला जातो.खरंतर ह्या उदात्त शब्दाला ,नात्याला अनुभवायचे असेल तर त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वात! कारण ते अनेकांच्या आयुष्यात पहाडासारखे उभे राहिले आणि सामान्य माणसांचे वारंवार समस्येतून संरक्षण केले.जिथं समस्या असेल तेथे आपल्या अनुभव आणि बुध्दीचा वापर करून त्या तडीस नेल्या. आपल्या मतदारसंघात अनेक योजना कार्यान्वित केल्या कि ज्यांचा आदर्श अखिल महाराष्ट्राने घेऊन त्या महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन राबविल्या .

"कर्तृत्वाचा बाणा आमचा छाती पोलादाची ,

महाराष्ट्राचा शिलेदार मी, कास विकासाची"

    हे ब्रीदवाक्य तंतोतंत त्यांच्याशी जुळतं. ह्या पोलादी छातीवर वेळप्रसंगी राजकिय, सामाजिक प्रहारही झाले.परंतू विकासाच्या माध्यमातून अशी संकटे त्यांनी परतवून लावली.आयुष्यातील प्रत्येक क्षणाचं सोनं केलं.

   जगाच्या कल्याणा,संताच्या विभुति...ह्या उक्तीनुसार ते झटत असतात. पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर ते स्वतःसाठी किती जगतात याचा विचार कधी आपण करतो?आपल्या जीवनात सुट्टीला अनन्यसाधारण महत्त्वआहे पण त्यांच्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनात कधी "सुट्टी" घेतलेली हितचिंतक म्हणून सांगू शकता? सर्व सामान्यहितार्थ त्यांनी संसारावर तुळशीपत्र ठेवलय हेही आपण लक्षात घ्यायला हवं.त्यांनाही पुढील आयुष्यात प्रत्येक क्षणी साथ देणं आपलं कर्तव्य आहे... आणि  पुढील काळात महाराष्ट्र  राज्याच्या मंत्रिमंडळात मानाचं स्थान मिळेल याच्या शुभेच्छा देणे आवश्यक आहे, हे येथे अधोरेखीत करणं गरजेचं आहे.

    आपल्या,सर्वसामान्यांच्या सुखी जीवनासाठी अहोरात्र कष्ट करून त्यांनी आपलं दुःख बाजुला ठेवुन अगोदर जनतेचं सांत्वन करावं, दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर मारावी आणि स्वतःचे झिरपणारे डोळे अलगद मागे वळून पुसावेत....म्हणून तर हा "राजा माणूस " सामान्यांचा असामान्य नेता....

     महाराष्ट्रात नवीन योजना, नवीन धोरणं, अनेक योजना कार्यरत करून पुर्णत्वाला नेण्याचे कार्य आमदार किसनजी कथोरे साहेबांनी केलय ! मग त्यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळावे हा त्यांचा आणि मुरबाडकरांचाही हक्क आहे ! इथं मुरबाडचा राजकिय नव्हे तर एक सजग नागरिक म्हणून मांडावसच वाटलं!

      अशा आदरणीय लोकमान्य लोकनेत्याला मंत्रीपदासाठी शुभेच्छा नाही तर अभिनंदन हाच शब्द उचित वाटतो.....



 - शब्दांकन- एकनाथ देसले (9226976798)(साजई,ता.मुरबाड,जि.ठाणे) 

Post a Comment

Previous Post Next Post