Header Ads Widget

Responsive Advertisement

मागील नुकसान भरपार्इ अद्दयापही नागरिकांना मिळालीच नाही...

 

(दि.09,POL - कुणाल शेलार, मुरबाड)

मुरबाड तालुक्यात मागील अनेक महिण्यांपूर्वी नैसर्गिक आपत्तीमध्ये वादळी वार्‍याने थैमान घालून अनेकांच्या घरांचे,दुकांनाचे व गार्इ गोठयाचे नुकसान झाले होते.या वादळी वार्‍यात अनेकांच्या घराचे पत्रे,छप्पर उडाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले होते त्यावर संबंधित अधिकारी महोदयांनी याबाबत तत्काळ पंचनामा करून सदर अहवाल वरिष्ठांना सादर केले होते.त्यावर अद्दयापही नुकसान भरपार्इ मिळाली नाही.झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत गावखेडयातील शेतकरी बांधवांचा प्रामुख्याने समावेश असून त्यापैकी मिळालेल्या माहितीनुसार काही शेतकरी बांधवांना व नागरिकांना नुकसान भरपार्इ अद्दयापही मिळाली नसल्याचे कळून येत आहे.तर या नुकसान भरपार्इ करिता नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपार्इ रक्कम अद्दयापही न मिळाल्याने येणार्‍या पावसाळयात कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास यावेळीचीही नुकसान भरपार्इ ही प्रलंबितच राहिल असेच म्हणावे लागणार आहे कारण मागील काही महिण्यापूर्वीची नुकसान भरपार्इ देण्यासाठी निधीच नसल्याने पुढील निधी पुढील वर्षीच मिळेल का असेही प्रश्‍न उभे राहत आहेत.

Post a Comment

0 Comments