Header Ads Widget

Responsive Advertisement

आरटीओ यांना पोलीसांच्या खाजगी गाडयावरील पोलीस नाव कसे दिसत नाही ; अधिवेशनाच्या दालनात उपोषणाचा इशारा

 

दि,21,POL,मुरबाड -

मुरबाड मध्ये काही दिवसांपूर्वी आरटीओ आपल्या स्कॉर्पिओ गाडी खाटेघर गावालगतच्या एका झाडाखाली थांबवून मनमानी पध्दतीने कॅमेरेच्या कैदीत दंड आकारणी करतांना दिसली असून हायस्पिड फलक नसताना दंड आकारणी येथील नागरिकांवर करण्यात आली त्यातच एका पत्रकाराला टार्गेट करून त्यांच्या कर्तव्यावर कार्यरत असताना घाईने हेल्मेट न घातल्याने पत्रकाराची गाडी पाहूनही कोणतेही माहिती न घेता ऑनलाईन दंड मारले.याच रस्त्यानी मोठया प्रमाणात प्रवासी येणे जाणे असताना तसेच माळशेज घाटातील ओव्हरलोड गाडया असताना अपघाताचे प्रमाण कमी व्हावेत म्हणून तेथे प्रामुख्याने न थांबता मुरबाडच्या झाडाआड दंडात्मक कारवाईकरिता सज्ज होतात.याच कल्याण मुरबाड माळशेज महामार्गावर पोलीसांच्या खाजगी वाहनांवर पोलीस पाटी लावून गाडया चालू आहेत,बसेस मोठया प्रमाणात हायस्पिडला गाडया चालवतात त्यात अनेक वेळा अपघातही झालेत त्यातच बसेसच्या आयएनडी पाटी नाहीत,मुरबाड मध्ये रेती माती वाळूच्या ओव्हरलोड गाडया सुरू आहेत त्याकडे लक्ष वेधले जात नाहीत,काल्या पिल्या सुरू असून त्यामध्ये जादा प्रमाणात नागरिकांना बसविले जाते,बेकायदेशीर वाहने सुरू आहेत,लोकप्रतिनिधी तसेच पोलीसांना दंड मारले जात नाहीत त्यांच्या गाडी कॅमेरेत कैद होत नाहीत,ड्रायव्हींग लायसन्स देतांना नेमकी निकष पाहूनच दिले जाते की नाही,घाटाकडून गुटखा येतो ते आरटीओंना दिसत नाहीत परंतु याकडे लक्ष न वेधता सर्वसामान्य जनतेला टार्गेट करून दंड आकारन्याची ठोकशाही करतात याकडे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी लक्ष वेधावे याकरिता पत्रकार कुणाल शेलार या पावसाळी अधिवेशनाच्या दालनात आमरण उपोषण करणार असल्याची भूमिका आज स्पष्ट केली असून सदरचे पत्र मुख्यमंत्री यांना पाठविले आहे त्यामध्ये आरटीओ अधिकारी यांनी मनमानी करून जी दंड वसूली केली आहे त्यांच्यावर नियमाचे पालन बेकायदेशीरपणे केले प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावे अशी प्रमुख मागणीचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments